breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीमुंबई

श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा; या खेळाडूंना मिळणार संधी

श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात शुभमन गिल करणार आपला टी 20 डेब्यु
मुंबई : भारतीय संघाची नव्या वर्षाची सुरुवात श्रीलंकेविरूद्ध टी 20 सामन्याने होणार आहे. 3 जानेवारी पासुन या सामन्याला सुरूवात होणार आहे. 3 टी 20 सामन्यांच्या सीरीजमधील पहिला सामना वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. भारतीय संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या करणार आहे. लवकरच टी 20 टीमचा कायमस्वरुपी कर्णधार म्हणून त्याचं नाव जाहीर होऊ शकतं.
वर्षाच्या पहिल्याच सीरीजमध्ये भारतीय संघ रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल या खेळाडुंशिवाय खेळणार आहे. त्यामुळे संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. PTI च्या वृत्तानुसार इशान किशनला ओपनिंगसाठी पहिली पसंती असेल. तर त्याच्यासोबत एकाच ओव्हरमध्ये 7 सिक्स मारणारा ऋतुराज गायकवाड दुसऱ्या ओपनरच्या भूमिकेत दिसू शकतो.
या सामन्यात शुभमन गिलला आपल्या टी 20 डेब्युची संधी मिळू शकते. म्हणजेच इशान किशनसोबत तो ओपनिंगला येईल. जर शुभमन गिलला पहल्या सामन्यात संधी मिळाली तर ऋतुराजला पहिला सामना खेळता येणार नाही. तर मीडल ऑर्डरमध्ये सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दीपक हुड्डा, संजू सॅमसन आणि अक्षर पटेलला संधी मिळू शकते. त्याशिवाय वेगवान गोलंदाजांमध्ये अर्शदीप सिंह, उमरान मलिक आणि हर्षल पटेल खेळू शकतात. युजवेंद्र चहलचा स्पेशलिस्ट स्पिनर म्हणून समावेश होऊ शकतो.

श्रीलंकेविरुद्ध संभाव्य भारतीय संघ :
इशान किशन, शुभमन गिल/ ऋतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, (कर्णधार) दीपक हुड्डा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, उमरान मलिक, युजवेंद्र चहल.

श्रीलंकेचा भारत दौरा :
पहिला टी-20 – 3 जानेवारी
दूसरा टी-20 – 5 जानेवारी
तिसरा टी-20 – 7 जानेवारी
पहिली एकदिवसीय – 10 जानेवारी
दूसरा एकदिवसीय – 12जानेवारी
तिसरी एकदिवसीय – 15 जानेवारी

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button