INDvs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे सामना रद्द होणार?
दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माचे संघात पुनरागमन
INDvs AUS : भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरूद्ध आज दुसरा वनडे सामना खेळणार आहे. हा सामना विशाखापट्टणम येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा टीमचे नेतृत्व करणार आहे. पहिल्या वनडे सामन्यात हार्दिक पांड्याने संघाचे नेतृत्व केले होते. दरम्यान, पहिल्या वनडे सामन्यात भारताने विजय मिळवला होता. आता आजचा सामना जिंकून भारत मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल.
दिल्ली, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशसह अनेक राज्यांतील काही शहरांमध्ये जोरदार पाऊस झाला. विशाखापट्टमची स्थितीही अशीच आहे. या ठिकाणीही आज पाऊस पडण्याची शक्यता आगे. Accuweather नुसार आज विशाखापट्टणमध्ये पावसाची ८० टक्के शक्यता आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहील.
भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, इशान किशन, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, उमरान मलिक, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर , मोहम्मद शामी, शार्दुल ठाकूर, जयदेव उनादकट.
ऑस्ट्रेलियन संघ :
डेव्हिड वॉर्नर, कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस सायनिस, जोस इंग्लिस, मिशेल मार्श, अॅश्टन अल्गर, अॅडम झाम्पा, नॅथन एलिस, शॉन अॅबॉट, मार्नस लाबुशेन, अॅलेक्स केरी.