breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

ICC ODI World Cup 2023 : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासह ९ सामन्यांचे वेळापत्रक बदलले

IND vs PAK : वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्याची तारीख अखेर बदलली आहे. यासह आणखी ८ सामन्यांचे वेळापत्रक बदलले आहे. भारत विरूद्ध पाकिस्तान सामना हा १५ ऑक्टोंबरला होणार होता. मात्र आता हा सामना १४ ऑक्टोंबरला होणार असल्याचं आयसीसीने जाहीर केलं आहे

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, भारत विरूद्ध पाकिस्तान सामना हा १४ ऑक्टोंबरला होणार आहे. त्यामुळे १४ ऑक्टोंबरला होणारा इंग्लंड विरूद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सामना १५ ऑक्टोंबरला दिल्ली येथे होणार आहे. तर पाकिस्तान विरूद्ध श्रीलंका यांच्यातील सामना १२ ऑक्टोंबरला होणार होता. तो सामना आता १० ऑक्टोंबरला हैदराबाद येथे होणार आहे.

ऑस्ट्रोलिया विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना १२ ऐवजी १३ ऑक्टोंबरला होणार आहे. तर न्यूझीलंड विरूद्ध बांगलादेश यांच्यातील सामना १४ ऑक्टोंबरला होणार होता. तो आता १३ ऑक्टोंबर रोजी चेन्नईत होणार आहे.

हेही वाचा – देशभरातील टोमॅटोचे वाढते दर पाहता सरकार नेपाळमधून करणार टोमॅटोची आयात!

इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यातला सामना दिवस रात्र होणार होता, परंतु तो आता सकाळी १०.३० वाजल्यापासून खेळवला जाणार आहे. १२ नोव्हेंबरचा ऑस्ट्रेलिया विरूद्ध बांगलादेश सामना सकाळी १०.३० सकाळी वाजता तर ११ नोव्हेंबरला इंग्लंड विरूद्ध पाकिस्तान यांच्यातला सामना दुपारी २ वाजल्यापासून सुरू होणार आहे.

दरम्यान, भारत आणि नेदरलँड्स यांच्यातला ११ नोव्हेंबरचा सामना १२ नोव्हेंबरला बंगळुरू येथे होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील १० शहरांमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड या २०१९च्या अंतिम सामन्यातील संघांमध्ये ५ ऑक्टोबरला पहिला सामना होईल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button