भारताच्या पदरात वर्ल्डकप नाही; पण ‘या’ 2 खेळाडूंनी राखली लाज
![India has no World Cup; But 'these' 2 players kept the shame](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/536511-team-india-wc-780x470.webp)
उद्या टी-20 वर्ल्डकपची फायलन रंगणार आहे. मात्र टीम इंडियाचा यामध्ये समावेश नाहीये. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला साजेसा खेळ करता आला नाही. सेमीफायनलच्या सामन्यात टीम इंडियाचा 10 विकेट्सने दारूण पराभव झाला. मात्र जरी टीम इंडियाचा पराभव झाला असला तरीही भारतीय खेळाडूंचा वर्ल्डकपमध्ये जलवा मात्र कायम आहे. वर्ल्डकप नाही पण ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट अवॉर्ड’ भारताच्या खात्यात येणार आहे.
ICC शॉर्टलिस्टमध्ये टॉप-2 मध्ये भारतीयांचा समावेश आहे
इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिल ने प्लेअर ऑफ द टूर्नामेंट अवॉर्डसाठी 9 खेळाडूंची निवड केलीये. यामध्ये किंग कोहली म्हणजेच विराट कोहलीचे नाव आहे. इतकंत नाही तर सूर्यकुमार यादव दुसऱ्या क्रमांकावर आहे.
आता मतदानाच्या आधारे यामध्ये एकाची निवड वर्ल्डकपमधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून केली जाणार आहे. त्यामुळे भारताच्या खात्यात हा अवॉर्ड जाण्याची अपेक्षा वर्तवण्यात येतेय.
कोहलीने या सिझनमध्ये 6 सामने खेळलेत. यामध्ये त्याने 98.66 च्या सरासरीने 296 रन्स केलेत. याशिवाय त्याने 4 अर्धशतकंही ठोकलीये. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सूर्यानेही या वर्ल्डकपमध्ये 6 सामने खेळले असून 59.75 च्या सरासरीने 239 रन्स केलेत. तर सूर्याने 3 अर्धशतकंही झळकावली.
पाकिस्तानी खेळाडूंची तिसऱ्या-चौथ्या क्रमांकावर छाप
आयसीसीच्या यादीत पाकिस्तानी खेळाडू शादाब खान आणि शाहीन शाह आफ्रिदी हे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. या सिझनमध्ये शादाबने चांगली कामगिरी केलीये. तर शाहीननेही चांगली गोलंदाजी केलीये. आतापर्यंत दोघांनीही गोलंदाजीत 10-10 विकेट्स घेतल्यात.
आयसीसीच्या यादीत भारत आणि पाकिस्तान यांच्याशिवाय इंग्लंडच्या तीन खेळाडूंच्या नावांची चर्चा टूर्नामेंट अवॉर्डसाठी आहेत. सॅम करन, जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स हे खेळाडू आहेत. यासोबतच झिम्बाब्वेचा सिकंदर रझा आणि श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा यांचाही या लिस्टमध्ये समावेश आहे.
रविवारी पाकिस्तान इंग्लंडमध्ये रंगणार फायनल
टी20 वर्ल्ड कप 2022 चा फायनल सामना मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यात इंग्लंड विरूद्ध पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. दरम्यान यामध्ये इंग्लंडचं पारड जड असल्याचं बोललं जातंय.