breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

IND vs IRE : आज आयर्लंडच्या या पाच खेळाडूंपासून टीम इंडियाला धोका! पाकिस्तानला लोळवण्यात बजावलेली भूमिका

IND vs IRE : टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील पहिला सामना भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. हा सामना 5 जूनला भारतीय वेळेनुसार 8 वाजा होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचं पारडं जड मानलं जातं आहे. पण असं समजणं महागातही पडू शकतं. कारण नुकताच पाकिस्तानला याचा अनुभव आला आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत निश्चित दुबळ्या समजल्या जाणाऱ्या संघांकडून मोठा उलटफेर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दिग्गज संघांना ताकही फुंकून पिणं गरजेचं आहे. नाही तर साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात येऊ शकतं. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताचा पहिलाचा सामना आयर्लंडविरुद्ध आहे. या सामन्यात भारतीय संघाचं पारडं जड आहे. भारतीय संघात विराट कोहली, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांच्यासारखे दिग्गज खेळाडू आहेत. त्यामुळे या प्रतिस्पर्धी संघांना या खेळाडूंच्या क्षमतेचा अंदाज आहे. पण प्रशिक्षक राहुल द्रविड कोणत्याच संघाला दुबळं मानत नाहीत. राहुल द्रविड यांनी स्पष्टच सांगितलं आहे की, आयर्लंड एक चांगला संघ आणि नुकतंच त्यांनी पाकिस्तानी संघाला पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे आयर्लंडला कमकुवत समजणं मोठी चूक ठरू शकते. द्रविडची ही भीती काही अंशी खरी आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. आयर्लंडचे पाच खेळाडू कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची ताकद ठेवतात. चला जाणून घेऊयात त्यांच्याबाबत

अँडी बलबर्नी : आयर्लंडकडून आघाडीला फलंदाजीसाठी येणारा अँडी बलबर्नी टीम इंडियासाठी धोक्याची घंटा आहे. या खेळाडूकडे एकूण 107 टी20 सामन्यांचा अनुभवक आहे. या सामन्यात त्याने आतापर्यंत 2370 धावा केल्या आहेत. नुकताच पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेत सर्वत्कृष्ट फलंदाज ठरला होता. बलबर्नीने 42 पेक्षा अधिकच्या सरासरीने 128 धावा केल्या आहेत.

लॉर्कन टकर : आयर्लंडचा विकेटकीपर लॉर्कन टकरही आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. एकदा का बॅट चालली की मागे पुढे पाहात नाही. पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेत त्याने चांगली कामगिरी केली होती. 42 च्या सरासरीने 128 धावा केल्या आहेत. तर त्याचा स्ट्राईक रेट हा 150 पेक्षा जास्त होता.

हॅरी टेक्टर : हॅरी टेक्टर हा संघातील सर्वात तरुण फलंदाज आहे. 23 वर्षीय हॅरीची बॅट चांगलीच तळपते. आतापर्यंत त्याने 76 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत 50 च्या सरासरीने 98 धावा केल्या होत्या.

जॉश लिटिल : डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाचा चेंडू स्विंग करण्यात हातखंडा आहे. वेग आणि अचूक टप्प्यामुळे आघाडीच्या फलंदाजांना सावध राहावं लागणार आहे. कारण डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांसमोर भारताचे आघाडीचे फलंदाज कमकुवत दिसले आहेत. त्याने 66 टी20 सामन्यात 78 गडी बाद केले आहेत. त्याचा इकोनॉमी रेटही 7.45 प्रति षटक इतकं आहे.

जॉर्ज डॉकरेल : आयर्लंडचा फिरकीपटू संघाचा कणा आहे. मधल्या षटकांमध्ये त्याच्या फिरकीची जादू कायम प्रतिस्पर्ध्यांना डोकेदुखी ठरते. निर्धाव चेंडू टाकून धावगती कमी करण्यास आघाडीवर आहे. त्याच्याकडे 136 टी20 सामन्यांचा अनुभव आहे. त्याचा इकोनॉमी रेट हा 7.2 धावा प्रति षटकं आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button