breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

IND vs IRE: रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, पहिल्याच सामन्यात रचला इतिहास

Rohit Sharma IND vs IRE : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत जोरदार सुरुवात केली आहे. रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाने आयर्लंडला पराभूत करत विजयी सलामी दिली आहे. टीम इंडियाने विजयासाठी मिळालेलं 97 धावांचं आव्हान हे 2 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. रोहित शर्मा टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला. रोहितने 52 धावांची खेळी केली. रोहितने या खेळी दरम्यान टी 20 क्रिकेटमधील 4 आणि टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात 1 हजार धावा पूर्ण केल्या. रोहितने आपल्या अर्धशतकी खेळीदरम्यान इतिहास रचला.

रोहित शर्माने वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली आहे. रोहितने आयर्लंड विरुद्ध 37 चेंडूत 4 चौकार आणि 3 सिक्ससह 52 धावा केल्या. रोहितने या दरम्यान 3 सिक्स ठोकले. रोहित यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 सिक्स पूर्ण केले. रोहित शर्माने 499 डावांमध्येही कामगिरी केली. रोहित अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज ठरला. रोहितनंतर या यादीत दुसऱ्या स्थानी वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ख्रिस गेल विराजमान आहे. गेलने आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 553 सिक्स ठोकले आहेत. गेलने ही कामगिरी 551 डावांमध्ये केली होती.

मार्टिन गुप्टील : 383 सिक्स. ब्रँडन मॅक्युलम : 398 सिक्स. शाहिद अफ्रिदी : 476 सिक्स. ख्रिस गेल : 553 सिक्स. रोहित शर्मा : 600 सिक्स.

दरम्यान टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमध्ये आयर्लंड विरुद्धचा हा एकूण आठवा विजय ठरला. तसेच टीम इंडिया आणि आयर्लंड हे दोन्ही संघ टी 20 वर्ल्ड कपमध्ये 15 वर्षांनी आमनेसामने होते. उभयसंघात 2009 सालच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये आमनासामना झाला होता. त्यानंतर टीम इंडियाने यंदा पुन्हा आयर्लंडला पराभूत केलं.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.

आयर्लंड प्लेइंग ईलेव्हन : पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेअर, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल आणि बेंजामिन व्हाइट.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button