IND vs ENG : चेन्नईच्या खेळपट्टीवर अश्विनने झळकावले शतक
![IND vs ENG: Ashwin scores a century on Chennai pitch](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/SAVE_20210215_163126.jpg)
चेन्नई – आर. अश्विनने आज धमाकेदार शतक झळकावले. अश्विनचे हे कसोटी क्रिकेटमधील पाचवे शतक ठरले. पण अश्विनने या शतकासह भारताच्याच माजी क्रिकेटपटूचे दात घातले घशात घातल्याचे यावेळी पाहायला मिळाले.
अश्विनने दुसऱ्या डावात शतक झळकावत भारताकडून सर्वाधिक धावसंख्या रचली. पण काल भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने फलंदाजीबाबत एक वक्तव्य केले होते. यावेळी आकाश म्हणाला होता की, ” चेन्नईच्या खेळपट्टीवर आता कोणताही खेळाडू शतक झळकावू शकणार नाही. रोहित शर्माने पहिल्या डावात दीड शतक झळकावले असले तरी तोदेखील या दुसऱ्या डावात शतक झळकावू शकणार नाही.” अश्विनने यावेळी शकत झळकावत आकाशचे दात घशात घातल्याचे पाहायला मिळाले आहे.
अश्विनने अजून एका विक्रमाला गवसणी घातली आहे. अश्विनने यावेळी आपलाच एक विक्रम मोडीत काढल्याचे पाहायला मिळाले आहे. चेन्नईच्या मैदानात यापूर्वी अश्विनने सर्वाधिक ६७ धावा केल्या होत्या. त्यावेळी प्रतिस्पर्धी संघ इंग्लंडचाच होता. इंग्लंडविरुद्ध २०१६ साली झालेल्या कसोटी सामन्यात अश्विनने ६७ धावांची खेळी साकारली होती. पण आजच्या सामन्यात अश्विनने आपलाच विक्रम मोडीत काढला असून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यामुळे घरच्या मैदानात या सामन्यात अश्विनने आतापर्यंतच्या सर्वाधिक धावा केल्याचे पाहायला मिळत आहे. फिरकी खेळपट्टीवर अश्विनचे हे शतक भारतीय संघासाठी मोलाचे आहे.
आकाशने नेमकं काय म्हटलं होतं पाहा…
आकाश चोप्राने यावेळी आपल्या एका व्हिडीओमध्ये सांगितले आहे की, ” चेन्नईतील दुसऱ्या डावात आता कोणताही फलंदाज शतक झळकावू शकत नाही, तो रोहित शर्मा असला तरी नाही. रोहित शर्मा यावेळी अर्धशतक झळकावू शकतो. त्याचबरोबर तो ७०पेक्षा जास्त धावा करु शकतो, पण तो शतक मात्र झळकावू शकत नाही. भारतीय संघ दुसऱ्या डावात ४५० धावांची आघाडी घेऊ शकतो. भारताने जर ४५० धावांची आघाडी घेतली तर त्यांचा विजय जवळपास निश्चित होऊ शकतो. त्यामुळे भारतीय संघाने जर एवढी मोठी आघाडी घेतली तर ते सामना जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी करु शकतात.”