breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय महिला संघ जाहीर, हरमनप्रीत कौरकडे नेतृत्त्व, पाहा संपूर्ण संघ

India Squad for Women’s T20WC | टी-२० विश्वचषक २०२४ साठी भारताच्या महिला संघाची बीसीसीआयने घोषणा केली आहे. संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे ऑक्टोबरमध्ये महिला T20 विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघात १५ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. याशिवाय ३ ट्रॅव्हलिंग रिजर्व आणि २ नॉन ट्रॅवलिंग रिजर्वदेखील निवडण्यात आले आहेत.

भारताचे नेतृत्त्व करण्याची जबाबदारी कर्णधार हरमनप्रीत कौरच्या खांद्यावर असेल. तर स्मृती मानधना ही भारताची उपकर्णधार असेल. भारताच्या फलंदाजी बाजूची जबाबदारी सलामीवीर शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज आणि दयालन हेमलता यांच्यावर वरच्या फळीत असेल, तर सजना सजीवनलाही संघात संधी मिळाली आहे. फिरकी विभागाचे नेतृत्व अष्टपैलू दीप्ती शर्मा, फिरकीपटू राधा यादव आणि लेग-स्पिनर आशा शोभना यांच्याकडे असेल.

हेही वाचा    –  मुख्यमंत्री शाळांमध्ये जाऊन पहारा देणार आहेत का? महिला अत्याचाराच्या घटनांवर बोलताना शिंदे गटाच्या नेत्याचं विधान 

अष्टपैलू खेळाडू श्रेयंका पाटीललाही संघात स्थान देण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या आशिया चषकादरम्यान झालेल्या बोटाच्या दुखापतीतून पाटील अद्याप सावरलेली नाही. श्रेयांका पाटील दुखापतीचा सामना करत असून ती दुखापतीतून सावरल्यानंतरच संघासोबत वर्ल्डकपसाठी जाणार आहे. रेणुका ठाकूर, पूजा वस्त्राकर आणि अरुंधती रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली भारताची वेगवान गोलंदाजी असेल. रिचा घोष आणि यस्तिका भाटिया यांना यष्टीरक्षक म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे.

टी-२० विश्वचषकासाठी भारताचा संघ :

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, ऋचा घोष (यष्टीरक्षक), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी , रेणुका सिंह ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, सजना सजीवन.

ट्रॅव्हलिंग रिजर्व : उमा छेत्री (यष्टीरक्षक), तनुजा कंवर, सायमा ठाकोर.

नॉन ट्रॅव्हलिंग रिजर्व : राघवी बिस्ट, प्रिया मिश्रा.

भारतीय महिला संघाचे वेळापत्रक

४ ऑक्टोबर : शुक्रवार, भारत वि. न्यूझीलंड, दुबई
६ ऑक्टोबर : रविवार, भारत वि. पाकिस्तान, दुबई
९ ऑक्टोबर : बुधवार, भारत विरुद्ध श्रीलंका, दुबई
१३ ऑक्टोबर : रविवार, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, शारजाह.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button