Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी
खलिस्तानींना ‘शहिद’ म्हणणाऱ्या हरभजनने अखेर माफी मागितली
![Former cricketer Harbhajan Singh infected with corona](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/harbhajan-singh.jpg)
मुंबई- भारतीय लष्कराने सुवर्ण मंदिरातील खलिस्तानी दहशतवाद्यांविरुद्ध राबवलेल्या ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ मोहिमेत ठार झालेला जर्नल सिंग भिद्रानवाले आणि इतर अतिरेक्यांना ‘शहीद’ म्हणून सलाम केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला क्रिकेटपटू हरभजन सिंग याने शेवटी माफी मागून या वादावर पडदा टाकला.
अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर कब्जा केलेल्या खलिस्तानी अतिरेक्याविरुद्ध भारतीय लष्कराने १ ते ८ जून १९८४ दरम्यान ऑपरेशन ब्लू स्टार राबवले होते. त्यात भिद्रानवालेसह त्याचे अनेक साथीदार मारले गेले होते. त्यानंतर हे पवित्र स्थळ अतिरेक्यांच्या कब्जातून मुक्त झाले होते. या घटनेला ३७ वर्ष झाल्यामुळे हरभजनने त्यांना शहीद असे संबोधतात आदरांजली वाहिली होती. त्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले. शेवटी या प्रकरणात त्याने माफी मागितली.