breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

IND vs AUS : भारताला विजयासाठी सोपं आव्हान, ऑस्ट्रेलिया १९९ धावांत ऑलआऊट!

IND vs AUS : एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी आज होत आहे. दोन्ही संघांना त्यांच्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने करायची आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांपुढे गुडघे टेकले.

जसप्रीत बुमराहने मिचेल मार्श याला झिरोवर आऊट केलं. विराट कोहली याने मार्शची स्लिपमध्ये कडक कॅच घेतली.त्यानंतर कुलदीप यादव याने डेव्हिड वॉर्नर याची आपल्याच बॉलिंगवर ४१ धावांवर आऊट झाला. यानंतर रवींद्र जडेजाने स्टीव्हन स्मिथ, मार्नस लबुशेन आणि एलेक्स कॅरी या तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवत ऑस्ट्रेलियाच्या मिडल ऑर्डरला ढेर केलं. जडेजाने स्टीव्हन स्मिथ याला ४६ धावांवर क्लिन बोल्ड केलं.

हेही वाचा – WhatsApp वर नंबर सेव्ह न करता मेसेज करायचायं? तर ‘या’ ८ स्टेप्स फॉलो करा 

ऑस्ट्रेलियन संघ भारताविरुद्ध ४९.३ षटकांत १९९ धावांत गारद झाला. हा सामना जिंकण्यासाठी भारताला ३०० चेंडूत केवळ २०० धावांचे आव्हान आहे. भारताकडून रवींद्र जडेजाने तीन विकेट्स घेतल्या. कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. सिराज, हार्दिक आणि अश्विनने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button