breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

हॉकी खेळाला भारताचा अधिकृत राष्ट्रीय खेळ जाहीर करा; सुप्रीम कोर्टात याचिका

नवी दिल्ली – हॉकीला भारताचा राष्ट्रीय खेळ अधिकृतरित्या जाहीर करण्यात आला नसल्याचे सांगत सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेनुसार हॉकी खेळला अधिकृतिरीत्या भारताचा राष्ट्रीय खेळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मार्च, 2021 मध्ये उत्तर प्रदेशच्या गोरखपुर येथील एका लॉ शिकणाऱ्या विद्यार्थ्याने माहिती अधिकाराद्वारे (RTI) खेळ मंत्रालयाकडून मागितलेल्या माहितीनंतर ‘भारत सरकारने सर्व खेळांना समान वागणूक देण्यासाठी कोणत्याच खेळाला राष्ट्रीय खेळ घोषित केला नसल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे हॉकी हा भारताचा अधिकृत खेळ नसल्याचे सिद्ध होत आहे. हॉकी भारतातील एक महान खेळ असून सरकारकडून हवा कसा सपोर्ट हॉकीला मिळालेला नाही. तसेच केंद्र सरकारने ऑलिम्पिकमध्ये खेळल्या जाणाऱ्या खेळांना शाळा आणि महाविद्यालयात प्रमोट करण्याची मागणी देखील या याचिकेत करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button