‘विराट कोहली माझ्यावर थुंकला होता’; दिग्गज खेळाडूचा खळबळजनक आरोप
Virat Kohli | दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डीन एल्गर याने भारतीय संघाचा फलंदाज विराट कोहलीवर गंभीर आरोप केला आहे. २०१५ मध्ये एल्गरचा पहिला भारतीय दौरा होता. या सामन्यात विराट कोहली त्याच्यावर थुंकला होता, असा दावा एल्गरने केला आहे. त्याच्या या वादग्रस्त दाव्याने क्रिकेट विश्वात खळबळ माजली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये एल्गर म्हणतो की, त्या दौऱ्यावेळी पिचवरून खिल्ली उडवली जात होती. तेव्हा मी फलंदाजीसाठी मैदानावर आलो. मी अश्विनविरोधात लय पकडण्याच्या प्रयत्नात होतो आणि त्याचं काय नाव जेजा (रविंद्र जडेजा) आणि कोहली माझ्याकडे पाहूण थुंकला. तेव्हा मी त्याला असं काही केलं तर तुला बॅटने मारेल असं ऐकवलं होतं. एल्गर याने यूट्यूब चॅनल Betway South Africa चॅनलला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
हेही वाचा – मराठा आरक्षणानंतर धनगर, मुस्लीम आरक्षणासाठी लढणार; मनोज जरांगे पाटील म्हणाले..
Dean Elgar :- Virat Kohli calls me aside and said can we go to have a drink I want to apologise for my actions and we drank till 3 in the morning
Not to forget he also used to promote a alcohol brand named "Royal Challenge" pic.twitter.com/9mRlXV31KM
— DHONIverse (@MSD_071113_) January 29, 2024
कोहलीला तुझी स्थानिक भाषा समजली का? असा प्रश्न एल्गरचा विचारण्यात आलं. तेव्हा एल्गर म्हणाला की, कोहलीला लक्षात आलं होतं कारण आयपीएल मध्ये एबी डिव्हिलियर्स त्याच्यासोबत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु टीममध्ये खेळतो. मात्र एल्गरने हेही स्पष्ट केलं की जेव्हा भारतीय संघ २०१७-१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता तेव्हा ड्रिंक्स दरम्यान कोहलीने त्याच्या वर्तनाबद्दल माफी मागीतली होती.