#Coronolockdown:स्पेनचे खेळाडू 4 मेपासून सराव सुरू करतील- पंतप्रधान पेड्रो सांचेज
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/IMG_20200430_095625.jpg)
माद्रिद- कोरोना व्हायरसच्या धोक्यादरम्यान खेळासाठी आशादायक बातमी समाेर आली आहे. स्पेनच्या सरकारने घोषणा केली, व्यावसायिक खेळाडू ४ मेपासून सराव करू शकतात. यापूर्वी, मंगळवारी इटलीच्या सरकारने देखील घरची फुटबॉल लीग सिरी ए मधील खेळाडूंना ४ मे पासून सरावास परवानगी दिली. यादरम्यान, राष्ट्रीय रायफल संघटनादेखील भारतीय खेळाडूंच्या पुनरागमनाच्या तयारीत आहे.
कोरोना व्हायरसमुळे स्पेनची घरची फुटबॉल लीग ला लीगामध्ये १२ मार्चपासून कोणता सामना होणार नाही. पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी म्हटले की, निर्णय लॉकडाऊन समाप्त करण्याची सुरुवात आहे. सध्या खेळाडूंना केवळ वैयक्तिक सराव करण्याची परवानगी असेल. आगामी काळात संघासोबत सराव करण्याची परवानगी देखील देऊ. सरावापूर्वी खेळाडूंना कोरोना स्क्रीनिंग चाचणी द्यावी लागू शकते. खेळाडूंना किट, मास्क व ग्लोव्हज सोबत यावे लागेल. एका वेळी ६ खेळाडूंना मैदानावर राहण्याची परवानगी मिळेल. स्पर्धेत सर्व संघांना अद्याप ११ फेऱ्या खेळायच्या बाकी आहेत.