#CoronaVirus: पाकिस्तानच्या एका क्रिकेटपटूने मागितली भारताकडे मदत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Untitled-30.png)
कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढ्यात क्रिकेटपटू एकत्र आले आहेत. फक्त भारतातच नाही तर परदेशातील क्रिकेटपटूंनी कोरोनाग्रस्तांसाठी मदत जाहीर केली आहे. भारताप्रमाणेच पाकिस्तानमध्ये करोनाचे रुग्ण आढळले आहेत. अशा परिस्थितीत तेथील क्रिकेटपटू एकमेकांना मदत करण्याचे आवाहन करत आहेत. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने भारताकडून मदत मागितली आहे. अशा कठीण परिस्थितीत जर भारताने १० हजार व्हेंटिलेटर दिले तर पाकिस्तान ही मदत नेहमी लक्षात ठेवेल असे अख्तरने म्हटले आहे.
त्याआधी अख्तरने करोना निधी गोळा करण्यासाठी भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना आयोजित करण्याचे आवाहन केले होते. दोन्ही देशांमधील राजकीय तणावामुळे अनेक वर्षापासून द्विपक्षीय क्रिकेट बंद आहे. हे दोन्ही संघ फक्त आयसीसी आणि आशिय कप स्पर्धेत एकमेकांविरुद्ध खेळतात.
आम्ही सामने घेण्याचा प्रस्ताव ठेवू शकतो. पण याबाबतचा निर्णय तर अधिकाऱ्यांनाच घ्यावा लागणार आहे. असे अख्तर म्हणाला. अशी मालिका झाली तर कोणत्याही देशांचे नुकसान होणार नाही. मालिकेत विराट कोहलीने शतक केले तर आम्हाला आनंद होईल आणि बाबर आजमने शतक केले तर तुम्ही आनंदी व्हाल. सामन्याचा निकाल काहीही लागला तरी दोन्ही संघांचा विजय होईल.असही अख्तर म्हणाला होता …