breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

#CoronaVirus: कोरोना व्हायरसमुळे क्रिकेटमधील पहिला बळी

कोरोना व्हायरसने जगभरात ३१ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. क्रीडा क्षेत्रातील दोघांचा या व्हायरसमुळे आतापर्यंत मृत्यू झाला होता. यातील पहिला मृत्यू स्पेनमधील एका फुटबॉल प्रशिक्षकाचा होता. त्यानंतर लंडनमध्ये पाकिस्तानच्या स्क्वॅशपटूचा मृत्यू झाला होता. आता क्रीडा क्षेत्राताल आणखी एक धक्का बसला आहे. कोरोना व्हायरसने क्रिकेटमधील एकाचा मृत्यू झाला आहे.


इंग्लंडमधील काऊंटी क्रिकेट क्लब लँकेशायर संघाचे चेअरमन डेव्हिड हॉगकिस यांचे कोरोना व्हायरसने निधन झाले. ते ७१ वर्षाचे होते. हॉगकिस यांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती. लँकेशायर संघाने यासंदर्भात निवेदन दिले आहे. क्लबच्या एका प्रवक्त्याने प्रेस असोसिएशनला हॉगकिस यांचे कोरोना व्हायरसमुळे निधन झाल्याचे सांगितले.

डेव्हिड यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह लँकेशायर संघाचे मोठे नुकसान झाले आहे. डेव्हिड यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बिघडली होती. गेल्या ३ वर्षांपासून ते संघाचे मॅनेजर होते. त्याआधी त्यांनी २२ वर्ष ओल्ड ट्रॅफर्ड सोबत काम केले होते. लँकेशायर संघाचे पहिले कोषाध्यक्ष आणि व्हाइस चेअरमन म्हणून त्यांनी काम पाहिले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button