#coronavirus: आयपीएल पुढे ढकलावी लागू नये म्हणून BCCI ची ‘आयडियाची कल्पना’
भारतामध्ये सध्या ‘करोना’चा थोड्या प्रमाणात प्रदुर्भाव झाल्याचे पाहायला मिळत आहे. भारतामध्ये सध्या करोना वायरसचे ४२ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेली आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्याचा विचार सुरु आहे. मात्र आयपीएल पुढे ढकलली तर बीसीसीआयला मोठे नुकसान होऊ शकते ..त्यामुळेच आता कोरोना वायरस रोखण्यासाठी आयपीएल एक वेगळीच शक्कल लढवणार असल्याचे समजतय. ही शक्कल जर यशस्वी ठरली तर आयपीएल सुनियोजित वेळेत होऊ शकते, असे आयपीएलच्या अधिकाऱ्यांना वाटत आहे.
आयपीएल पुढे ढकलली तर बीसीसीआयला मोठे नुकसान होऊ शकते आणि बीसीसीआयला ते होऊ द्यायचे नाही. त्यामुळे आयपीएल सुनियोजित वेळेत कशी करायची, याचा विचार बीसीसीआयमधील चाणक्यांनी केला आहे. आयपीएल पाहण्यासाठी स्टेडियममध्ये हजारोंच्या पटीने प्रेक्षक जमतात आणि त्यामुळे करोना वायरसचा प्रसार होऊ शकतो…त्यामुळे सामन्यांसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये एंट्रीच दिली जाणार नाही, असे केल्यास आयपीएल पुढे ढकलण्याची वेळ येऊ शकत नाही, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना वाटत आहे.
अद्याप तरी या आडियाची कल्पना आमलात आणणार आहे की नाही हे स्पष्ट झालेलं नाही..त्यामुळे आयपीएल पुढे ढकलली जाऊ शकते की नाही यावर प्रश्नचिन्हच आहे…