Breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

चिराग-सात्विक जोडीचा ऐतिहासिक विजय, पुरुष दुहेरी चषकावर कोरलं नाव

इंडिया ओपन 2022 या स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी  या जोडीने पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात विजय मिळवत स्पर्धा जिंकली आहे. इंडिया ओपन सुपर 500 बॅडमिंटन टूर्नामेंटच्या या पुरुष दुहेरीच्या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी अप्रतिम खेळ दाखवत विजय मिळवला. त्यांनी फायनलमध्ये इंडोनेशियाचे  दिग्गज खेळाडू हेंड्रा सेतियावान आणि मोहम्मद एहसान यांच्या जोडीला नमवत हा विजय मिळवला आहे.

चिराग आणि सात्विक यांनी नमवलेली ही इंडोनेशियाची जोडी सद्यस्थितीला जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावार आहे. या सामन्यात चिराग आणि सात्विक यांनी दोन सेट्मसमध्ये हा विजय मिळवला आहे. यामध्ये पहिल्या सेटमध्ये चिराग आणि सात्विकने धमाकेदार खेळ दाखवला. ज्यामुळे हा सेट त्यांनी 21-16 अशा चांगल्या फरकाने नावावर केला. तर दुसऱ्या सेटमध्ये मात्र इंडोनेशियाच्या खेळाडूंनी पुनरागमन करण्याचा जोरदार प्रयत्न केला. पण अखेर या अटीतटीच्या सेटमध्ये 26-24 ने चिराग-सात्विक जोडीनेच विजय मिळवत चॅम्पियनशिपचा खिताब पटकावला.

जागतिक क्रमवारीत 10 व्या क्रमांकावर असणाऱ्या चिराग आणि सात्विक यांची जोडीने दुसऱ्या क्रमाकांच्या इंडोनेशियन जोडीला मात दिल्याने सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे. या जोडीने दुसऱ्यांदा अशाप्रकारच्या सुपर 500 टूर्नामेंटमध्ये विजय मिळवला आहे. याआधी त्यांनी 2019 मध्ये थायलंड ओपन सुपर 500 बॅडमिंटन टूर्नांमेंटमध्ये विजय मिळवला होता.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button