क्रिडाताज्या घडामोडीमुंबई

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियातून वगळलं

इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज

मुंबई : इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. पण टी20 संघाचं नेतृत्व करणाऱ्या सूर्यकुमार यादवला चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळण्यात आलं आहे. टी20 फॉर्मेटमध्ये भलेभले गोलंदाज सूर्यकुमारला घाबरतात. पण या उलट चित्र वनडे मालिकेत पाहायला मिळतं. 37 वनडेत त्याने मधल्या फळीत फलंदाजी करतना 25.76 च्या सरासरीने 773 धावा केल्या आहेत. याबाबत सूर्यकुमार यादवला पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आले. यावर सूर्यकुमार यादवने दिलखुलासपणे उत्तर दिलं. त्याला विचारलं की चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियात निवड झाली नाही याचं दु:ख वाटलं का? तेव्हा सूर्यकुमार यादव म्हणाला, ‘यामुळे दु:ख का होईल? मी जर चांगली कामगिरी करत असतो तर मी चम्पियन्स ट्रॉफीत असतो. जर मी चांगली कामगिरी करत नाही तर ते स्वीकार करणं आवश्यक आहे. जर तुम्ही टीम पाहाल तर खरंच चांगली आहे. जे पण संघात आहेत ते चांगली कामगिरी करत आहेत. त्यांनी भारतासाठी त्या फॉर्मेटमध्ये आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. मी त्यांच्यासाठी खूश आहे.’

हेही वाचा  :  सोनं व चांदी खरेदी करायचा विचार करताय? तर जाणून घ्या आजचे दर 

‘पण मी चांगली कामगिरी करू शकलो नाही, याचा विचार करून वाईट वाटतं. जर मी चांगली कामगिरी केली असती तर नक्कीच तिथे असतो. जर मी चांगली कामगिरी करत नाही तर चांगल्या कामगिरी करणाऱ्या खेळाडूची निवड होणं हा त्याचा हक्क आहे.’, असंही सूर्यकुमार यादव पुढे म्हणाला. दरम्यान, सूर्यकुमार यादवने मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहबाबतही आपल्या भावना व्यक्त केल्या.

‘मी त्यांच्यासोबत खूप क्रिकेट खेळलो आहे. ते अनुभवी गोलंदाज आहेत. जेव्हा भारतासाठी खेळतात तेव्हा वेगळीच भावना असते. अतिरिक्त जबाबदारी आणि खेळणं पसंत करतात. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा एकत्रित गोलंदाजी करताना पाहणं मजेशीर असेल. आपण हे 2023 वनडे वर्ल्डकपमध्ये पाहिलं आहे. त्यांनी खरंच चांगली गोलंदाजी केली. आशा आहे की, चॅम्पियन्स ट्रॉफीतह तसंच पाहायला मिळेल.’, असं सूर्यकुमार यादवने सांगितलं.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button