मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! बुमराह IPL2023,WTC फायनलला मूकणार?
मुंबई : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यंदाच्या आयपीएल मधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. बुमराहचा त्रास काही कमी होण्याचं नाव घेत नाही. त्याच्या पाठीची दुखापत आता पुर्वीपेक्षा खूपच गंभीर असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तो जूनमध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी अजिक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणेही कठीण आहे.
गेल्या वर्षी जुलौमध्ये इंग्लंड दौऱ्यावर बुमराहच्या पाठीची समस्या समोर आली होती. स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे बुमराह अशिया कपमध्ये खेळू शकला नव्हता. यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्ध टी-२० सामन्यात पुनरागमन केले पण त्याला केवळ दोन सामन्यानंतर वगळण्यात आले. यानंतर बुमराह टी-२० विश्वचषकातून बाहेर झाला.
मीडिया रिपोर्ट नुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि आयपीएलच्या सुत्रांनी असे सूचित केले आहे, की जवळपास पाच महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर असलेल्या बुमराह पूर्णपणे तंदुरूस्त वाटत नाही. त्यामुळे तो कदाचित बराच काळ बाहेर राहू शकतो. त्यामुळे बुमराहला अशिया चषकालाही मुकावे लागले असले तरी ऑक्टोंबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या विश्वचषकापर्यंत जसप्रीत बुमराहला तंदुरूस्त ठेवण्याकडे टीम इंडियाचे लक्ष आहे.