ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले रुग्णालयात दाखल
![Brazil's greatest footballer Pel hospitalized](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/pele.jpg)
साओ पावलो – ब्राझीलचे विश्वविख्यात महान फुटबॉलपटू पेले यांना बुधवारी साओ पावलो येथील अलबर्ट आईनस्टाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना मोठ्या आतड्याचा कॅन्सर असल्याने त्यावर केमोथेरपी करण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे त्यांच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
प्रवक्त्यांनी पेले यांच्या प्रकृतीबाबत बोलताना सांगितले की, ‘त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि येत्या काही दिवसात त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल.’ दरम्यान, पेले यांचे वय ८१ वर्ष आहे. त्यांच्या मोठ्या आतड्यातील ट्युमरवर सप्टेंबरमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी पेले यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘जेव्हा मार्ग खडतर असतो तेव्हा या प्रवासातील प्रत्येक पावलाचा आनंद घ्या. तुमच्या आनंदावर लक्ष केंद्रीत करा. हे खरं आहे की मी आता उड्या मारू शकत नाही. मात्र या दिवसात मी अनेकवेळा विजय साजरा केला आहे. तुम्ही पाठवलेल्या संदेशांनी माझे आयुष्य परिपूर्ण झाले आहे. तुमच्या प्रेमासाठी आभार’, अशी पोस्ट त्यांनी केली होती. चॅम्पियन्स लीगमध्ये एमबाप्पेने मेस्सीचे रेकॉर्ड मोडले. पेले यांनी ब्राझीलला तीन वेळा विश्वचषक जिंकून दिला होता. ते १९५८च्या वर्ल्डकपमध्ये युवा फुटबॉलपटू म्हणून खेळले होते. मात्र निवृत्तीनंतरही त्यांच्यावरील चाहत्यांचे प्रेम कमी झालेले नाही. फिफाने २००० मध्ये पेलेंना प्लेयर ऑफ द सेंच्युरी पुरस्कार दिला होता. पेले यांना हा पुरस्कार अर्जेंटिनाच्या डिएगो मॅराडोना यांच्याबरोबर विभागून देण्यात आला होता. गेल्या वर्षीही पेले यांची प्रकृती खालावली होती.
टॅग्स :
Brazil, Pelé