क्रिडा

‘क्रॉसवर्ड’ चिंचवडमध्ये संजय दुधाणेंच्या पुस्तकांचे गुरूवारी ‘बुक साईनिंग’

चिंचवड : ‘क्रॉसवर्ड’ आणि ‘सकाळ प्रकाशनाच्या संजय दुधाने लिखित ‘ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा’ पुस्तकांचा ‘बुक साईनिंग’ कार्यक्रम होणार आहे. वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी क्रॉसवर्ड बुक स्टोर्सच्या वतीने ‘बिग बुक पुणे फेस्ट’ उपक्रम राबवण्यात येत आहे. शुक्रवारी, २७ सप्टेंबर २०२४ रोजी एल्प्रो सिटी, स्क्वेअर मॉल, चिंचवड येथे होणाऱ्या या कार्यक्रमात लेखकांना भेटण्याची संधी वाचकांना मिळणार आहे.

प्रसिद्ध क्रीडा पत्रकार संजय दुधाने यांनी नीरजची मेहनत आणि त्याच्या कारकीर्दीतील चढ-उतार जवळून पाहिले आहेत, याचा प्रत्यय ‘ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा’ हे पुस्तक वाचताना प्रत्येक क्रीडाप्रेमीला येईल. एका शेतकऱ्याचा मुलगा ते ऑलिंपिक स्पर्धेतील पदकविजेता हा नीरजचा प्रवास कथन करणारे हे चरित्र केवळ क्रीडापटूंनाच नव्हे, तर सर्वच वाचकांना प्रेरणा देईल असे आहे. कार्यक्रमानिमित्त शुक्रवारी, २७ सप्टेंबर २०२४, सायं. ६ वा. एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉलमध्ये लेखक दुधाने वाचकांसोबत चर्चा करतील.

हेही वाचा  – To The Point : उपमुख्यमंत्री फडणवीसांचे विरोधकांच्या प्रश्नांना विकासकामातून उत्तर!

‘बुक साईनिंग’ कार्यक्रमात लेखक पुस्तकांच्या प्रतींवर स्वाक्षरी करतील आणि वाचकांशी संवाद साधतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. तरी या संधीचा रसिकांनी जरूर लाभ घ्यावा, अशी विनंती ‘सकाळ प्रकाशना’च्या वतीने करण्यात आली आहे.

कार्यक्रम : ‘ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा’ लेखक भेट आणि बुक साईनिंग
लेखक : संजय दुधाने
वेळ: शुक्रवारी, २७ सप्टेंबर २०२४, सायं. ६ वा.
स्थळ : क्रॉसवर्ड बुकस्टोअर, एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉल, चिंचवड

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button