breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीराष्ट्रिय

पैलवान सुशील कुमारला दणका; रेल्वेतून हकालपट्टी, नोकरी गमावली

नवी दिल्ली – ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार याला छत्रसाल स्टेडियमवरील २३ वर्षीय सागर राणा हत्या आणि मारहाण प्रकरणात अटक झाल्यानंतर न्यायालयाने 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आता उत्तर रेल्वेने सुशील कुमारला सेवेतून निलंबित केले आहे. त्यामुळे त्याच्यावर नोकरी गमावण्याचीही वेळ आली आहे.

सागर राणा हत्या प्रकरणात सुशील कुमारचा असलेला सक्रिय सहभाग पाहता उत्तर रेल्वेने त्याला सेवेतून निलंबित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. उत्तर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत घोषणा केली. दरम्यान, ऑलिम्पिक पुरस्कार विजेता सुशील कुमार हा उत्तर रेल्वेचा वरिष्ठ वाणिज्यिक व्यवस्थापक आहे. 2015 पासून तो प्रतिनियुक्तीवर दिल्ली सरकारमध्ये आहे. त्याला शालेय स्तरावरील खेळाच्या विकासासाठी छत्रसाल स्टेडियमवर विशेष अधिकारी (OSD) म्हणून नियुक्त केले होते.

सुशील कुमार आणि त्याच्या साथीदारांनी सागर धनखडला एखाद्या प्राण्याला मारावे तसे मारले. सुशील कुमार आणि त्याच्या साथीदारांना त्या भागात आपली दहशत निर्माण करायची होती, असे न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान दिल्ली पोलिसांनी सांगितले.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button