इंग्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआयने जाहीर केला भारत ‘अ’ संघ; अभिमन्यू इसवरनकडे कर्णधारपद

India vs England Test Series | भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने (बीसीसीआय) इंग्लंड दौऱ्यासाठी भारत ‘अ’ संघाची घोषणा केली आहे. या संघाचे नेतृत्व युवा फलंदाज अभिमन्यू इसवरनकडे सोपवण्यात आले आहे, तर सलामीवीर म्हणून यशस्वी जयस्वालची निवड झाली आहे. हा संघ इंग्लंडमध्ये तीन सामने खेळणार असून, यामध्ये दोन प्रथम श्रेणी सामने आणि एक इंट्रा-स्क्वॉड सामना समाविष्ट आहे.
भारत ‘अ’ संघात मुंबईच्या खेळाडूंना चांगलीच संधी देण्यात आली आहे. यशस्वी जयस्वाल, सर्फराझ खान, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे आणि तनुष कोटियन यांच्या समावेशाने मुंबईच्या क्रिकेटपटूंनी संघात आपला ठसा उमटवला आहे. याशिवाय, संघात दोन यष्टीरक्षकांचा समावेश आहे – ध्रुव जुरेल आणि इशान किशन. ध्रुव जुरेलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे.
हेही वाचा : ISIच्या निमंत्रणावरून गोगोईंचा पाक दौरा; हिमंता बिस्व सरमांचा आरोप
भारत ‘अ’ संघाची संपूर्ण यादी:
अभिमन्यू इसवरन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, करुण नायर, ध्रुव जुरेल (उपकर्णधार, यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, शार्दुल ठाकूर, इशान किशन (यष्टीरक्षक), मानव सुथार, तनुष कोटियन, मुकेश कुमार, आकाश दीप, हर्षित राणा, अंशुल कंबोज, खलील अहमद, ऋतुराज गायकवाड, सर्फराझ खान, तुषार देशपांडे, हर्ष दुबे.
दौऱ्याचे वेळापत्रक :
भारत ‘अ’ संघ इंग्लंड लायन्सविरुद्ध दोन प्रथम श्रेणी सामने खेळणार आहे, तसेच एक इंट्रा-स्क्वॉड सामना खेळला जाईल. दौऱ्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे:
पहिला सामना: 30 मे ते 2 जून 2025
दुसरा सामना: 6 ते 9 जून 2025
तिसरा सामना (इंट्रा-स्क्वॉड): 16 ते 19 जून 2025