पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवणारे खाशाबा जाधवांना पद्म पुरस्कार द्या; अमोल कोल्हेंची गृहमंत्र्यांकडे मागणी
![Award the Padma to Khashaba Jadhav, the first individual Olympic medalist; Amol Kolhe's demand to Home Minister](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/Esakal__42_.jpg)
नवी दिल्ली | टीम ऑनलाइन
स्वतंत्र भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक खाशाबा जाधव यांनी मिळवून दिले होते. मात्र अजूनही त्यांना कोणताही पद्म पुरस्कार मिळालेला नाही. याच संदर्भात त्यांचे सुपूत्र रणजीत खाशाबा जाधव आणि कुस्ती मल्लविद्या महासंघाचे पदाधिकारी पैलवान संग्राम कांबळे यांनी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो अमोल कोल्हे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले.
त्यांनी या सोबत ‘स्वतंत्र भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे स्व. पैलवान खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्कार मिळावा या मागणीसाठी त्यांचे सुपुत्र श्री. रणजित खाशाबा जाधव आणि पै. संग्राम कांबळे (कुस्ती मल्लविद्या महासंघ) यांनी नवी दिल्ली येथे भेट घेतली.’
‘स्व. पै. खाशाबा जाधव यांच्या कर्तृत्वाला न्याय मिळावा यासाठी मा. केंद्रीय गृहमंत्री श्री. अमितजी शाह आणि मा. केंद्रीय क्रीडामंत्री श्री. अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांना तातडीने पत्र पाठवून स्व. खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्कार देण्याची मागणी केली.’ अशी पोस्ट लिहिली.
https://www.facebook.com/Dr.AmolKolhe/posts/5397093210307158
या पोस्टवरील माहितीनुसार खासदार अमोल कोल्हे यांनी पैलवान खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्कार मिळावा यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र पाठवले आहे.