IND vs PAK सामन्याआधी आफ्रिदी-विराटची भेट; कोहलीला म्हणाला,’आम्ही प्रार्थना करतो की तुला’..
![Afridi-Virat meet before IND vs PAK match; Said to Kohli, 'We pray that you'..](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/Feature-55.jpg)
IND vs PAK: आशिया चषकमध्ये भारत आणि पाकिस्तान २८ ऑगस्ट रोजी आमनेसामने येणार आहेत. सामन्यापूर्वी दोन्ही संघ जोरदार सराव करत आहेत. या दोन्ही देशातील तणाव पाहता केवळ क्रिकेटच्या मैदानावरच नव्हे तर या संघांच्या फॅन्समध्ये सोशल मीडियापासून ते गल्लीपर्यंत चढाओढ पाहायला मिळते. तणाव किंवा वाद कितीही असले तरी असं म्हणतात की क्रिकेट हा जंटलमन्सचाचा खेळ आहे. अशीच काहीशी खेळाडूवृत्ती दाखवणारा एक व्हिडीओ सध्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डने ट्विटरवरून शेअर केला आहे. यामध्ये भारताचा माजी कर्णधार विराट कोहली हा पाकिस्तानचा खेळाडू शाहीन आफ्रिदीशी बोलताना दिसतोय, त्यांच्या काही सेकंदांच्या गप्पांमध्ये आफ्रिदीने विराटला म्हटलेलं एक वाक्य सर्वांचं मन जिंकून गेलं आहे.
प्राप्त माहितीनुसार, वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर पडला असला तरी दुबईत पाकिस्तान संघासोबत उपस्थित आहे. आफ्रिदी जेव्हा दोन्ही संघांचा सराव पाहायला पोहचला होता तेव्हा तिथे उपस्थित भारतीय खेळाडूंनीही त्याची भेट घेतली. विराटसह केएल राहुल आणि ऋषभ पंत यांनी सुद्धा आफ्रिदीच्या दुखापतीची चौकशी करून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
विराट आणि आफ्रिदीच्या संभाषणात आपण ऐकू शकता की, आफ्रिदी विराटला आपल्या प्रकृतीविषयी सांगताना विश्वचषकापर्यंत आपण ठणठणीत होऊ असे म्हणाला. यानंतर आम्ही अशी दुवा करतो की तुमचा गेलेला फॉर्म लवकरात लवकर पुन्हा सापडावा असे म्हणत आफ्रिदीने विराटला शुभेच्छा दिल्या आहेत.
Stars align ahead of the #AsiaCup2022 🤩
A high-profile meet and greet on the sidelines 👏 pic.twitter.com/c5vsNCi6xw
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 25, 2022