Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

भारतीय संघाला मोठा धक्का! हार्दिक पांड्या वर्ल्डकपमधून बाहेर

World Cup 2023 : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या वर्ल्डकप स्पर्धेत खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे भारतीय संघाला मोठआ धक्का बसला आहे. बांगलादेशविरुद्धच्या लढतीत हार्दिकच्या पायाला दुखापत झाली होती. तेव्हापासूनच हार्दिकच्या पुनरागमनाकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले होते. मात्र आता चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

आईसीसीने दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक पांड्या घोट्याच्या दुखापतीतून सावरण्यात अपयशी ठरला असून तो उर्वरित स्पर्धेला मुकणार आहे. हार्दिकच्या जागी प्रसिद्ध कृष्णा संघात खेळणार आहे.

हेही वाचा – महाराष्ट्रात कोणत्या जातींना किती टक्के आरक्षण! वाचा सविस्तर..

भारतीय संघाने सातपैकी सात सामने जिंकत सेमी फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. भारताच्या आता दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्सविरुद्ध लढत होणार आहे. दुखापतीचं स्वरुप गंभीर असल्याने हार्दिक बंगळुरूला एनसीएमध्ये दाखल झाला आहे.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button