breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

२६ वर्षीय युवा फुटबॉलपटूचा खेळताना मृत्यू

स्कॉट डिसुझा या २६ वर्षीय युवा खेळाडूचा फुटबॉलच्या मैदानावर खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी संध्याकाळी साडेसात वाजता घडली आहे. मुंबईतील सेंट सेबॅस्टियन शाळेच्या मैदानावर दादरमधील पीस हेवन सोसायटीमधील रहिवासी असणारा स्कॉट नेहमीप्रमाणे फुटबॉल खेळण्यासाठी आला होता.

मात्र खेळताना त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याबरोबरच तो मैदानावर कोसळला. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला तातडीने हिंदुजा रुग्णालयात नेले. मात्र तेथे त्याला डॉक्टरांनी लगेचच मृत घोषित करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button