हॉकी अजिंक्यपद स्पर्धा : क्रीडा प्रबोधिनी संघांची बाद फेरीकडे वाटचाल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/Hockey-.jpg)
- ऑलिम्पिक डे फाईव्ह-अ-साईड हॉकी अजिंक्यपद स्पर्धा
पुणे – क्रीडा प्रबोधिनीच्या पुरुष आणि महिला संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना पहिल्या ऑलिम्पिक डे फाईव्ह अ-साईड हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत बाद फेरीकडे आगेकूच केली. हॉकी महाराष्ट्रआणि हॉकी पुणे यांच्यातर्फे पुरुष आणि महिला गटांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यत आली आहे. नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या मुलींच्या गटात क्रीडा प्रबोधिनी संघाने पाषाण इलेव्हन संघाचा 16-0 असा धुव्वा उडविला. वैष्णवी फाळके व अंकिता सपाते यांनी प्रत्येकीे 3, ऋतुजा पिसाळ हिने 4, स्वाती जाधव आणि मानसी शेडगे यांनी प्रत्येकी दोन, तर अक्षता ढेके व मानश्री शेडगे यांनी एकेक गोल केले.
पुरुष गटात क्रीडा प्रबोधिनीने सेंट्रल रेल्वे संघाचा 4-2 असा पराभव केला. वेंकटेश कन्चे, रोहन पाटील, अनिकेत गौरव व तालिब शहा यांनी प्रत्येकी एक गोल करून संघाला विजय मिळवून दिला. आजच्या अन्य लढतींमध्ये महिला गटांत पुणे इलेव्हन संघाने, तर पुरुष गटांत पुणे मॅग्निसियन व चिखलवाडी यंग बॉईज या संघांनी विजयी आगेकूच केली.
सविस्तर निकाल –
महिला विभाग- अ गट-
1) क्रीडा प्रबोधिनी- 16 (वैष्णवी फाळके 1, 2, 23 मि., ऋतुजा पिसाळ 3, 7, 9, 18, 22 मि., स्वाती जाधव 4, 23 मि., अक्षता ढेके 10 मि., अंकिता सपाते 11, 13, 28 मि., मानश्री शेडके 14, 29 मि.) वि.वि. पाषाण इलेव्हन- 0;
2) गट बः पुणे इलेव्हन- 5 (दीक्षा पाटील 11, 22 मि., कविता विद्यार्थी 17, 25 मि., राधिका वाडकर 19 मि.) वि.वि. 5 स्टार इलेव्हन- 2 (समृद्धी झुजाम 21 मि., दुर्गा शिंदे 24 मि.);
पुरुष विभाग- 1) क्रीडा प्रबोधिनी- 4 (वेंकटेश कन्चे 15 मि., रोहन पाटील 19 मि., अनिकेत गौरव 22 मि., तालिब शहा 29 मि.) वि.वि. सेंट्रल रेल्वे- 2 (अनिकेत मुथय्या 7 मि., आशिष भोसले 19 मि.);
2) पुणे मॅग्निसियन- 10 (पवन रसाळा 8, 19, 29 मि., अजय मोरे 12 मि., राहूल रसाळा 16, 18, 19, 22, 25, 26 मि.) वि.वि. फ्रेन्डस् युनियन- 3 (रेहान शेख 13 मि., गणेश बनसोडे 23 मि., सानिल हिरवे 28 मि.);
3) चिखलवाडी यंग बॉईज- 6 (हर्ष मुथय्या 15 मि., तुषार दुर्गा 16, 27, 28 मि., सेल्वराज पिल्ले 23 मि., अभिजीत भोसले 26 मि) वि.वि. हॉकी लव्हर्स- 4 (प्रणय गरसौंड 12, 18 मि., अक्षय गरसौंड 17, 28, 28 मि.).