breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

स्मृती मंधाना धडाकेबाज फलंदाजी…हवेत उडी मारत एकहाती बॉलची पकडली कॅच…

भारतीय महिला संघाची क्रिकेटपटू स्मृती मंधाना ही तिच्या धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखली जाते. मात्र महिलांच्या टी-२० चॅलेंजर ट्रॉफीत भारत ब संघाकडून खेळताना स्मृतीने भल्याभल्या खेळाडूंनाही लाजवेल अशाप्रकारे हवेत उडी मारत एकहाती बॉलची कॅच पकडली.

भारत अ संघ फलंदाजी करताना, अनुजा पाटील सहावं षटक टाकत होती. देविका वैद्यने अनुजाच्या गोलंदाजीवर कव्हरचा फटका खेळला, मात्र स्मृतीने सीमारेषेच्या दिशेने जाणारा चेंडू हवेत उडी मारत एक हाती कॅच पकडत देविका वैद्यला माघारी धाडलं…

सोशल मीडियावर स्मृती मंधानाच्या या भन्नाट कॅचचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. स्मृतीने आपल्या कुशल नेतृत्वाच्या जोरावर भारत ब संघाने टी-२० चॅलेंजर ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button