Breaking-newsक्रिडा
साहिल मरगजेची सुवर्ण कामगिरी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/sports.jpeg)
पुणे – स्पोर्टस अँथॉंरिटी आँफ इंडिया (साई)च्या सहकारनगर येथील मुक्तांगण स्कूलमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या साहिल मरगजेने 53 व्या मिनी सब ज्युनिअर अर्टिस्टीक आणि 14 वर्षांखालील सब ज्युनिअर ट्राम्पोलिंग, टंब्लिंग जिम्नॅस्टिक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.
डोंबिवली येथील श्रवण स्पोर्टस ऍकॅडमीमध्ये नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत 14 वर्षाखालील ट्राम्पोलिंग जिम्नॅस्टिक प्रकारामध्ये तसेच ट्राम्पोलिंग प्रकारामध्ये साहिल मरगजे याने दुहेरी सुवर्णपदकाची कमाई केली.