breaking-newsक्रिडा

शिक्षणात “क्रीडा’ विषयाचा समावेश करा! ; सचिन तेंडुलकरांची राज्यपालांकडे मागणी

  •  दिवसांतून किमान 1 तास खेळासाठी द्यावा

मुंबई- शाळेतील तरुणांईंची तंदुरूस्ती व शरीर स्वास्थासाठी “क्रीडा’ हा विषय शिक्षणात समावेश करावा. तसेच शालेय ते महाविद्यालयापर्यंत सर्वांना दिवसांतून किमान 1 तास खेळासाठी द्यावा. त्यासाठी सर्व विद्यापिठांमध्ये तरुण आणि स्वस्थ भारत’ मोहीम राबवावी अशी विनंती भारतरत्न सचिन तेंडूलकर यांनी राज्यपाल यांना केली.

सचिन तेंडूलकर यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. मे महिन्यात सचिन तेंडूलकर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला भेट देऊन “तरुण आणि स्वस्थ भारत’ अभियान राबविण्याबद्दल पुढाकार घेतला होता. हे अभियान राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये राबवावे या दृष्टीने तेंडूलकर यांनी राज्यपालांशी चर्चा केली.
भारत हा क्रीडाप्रेमी देश असून आता प्रत्यक्ष खेळणारा देश झाला पाहिजे. लहान मुलांमधील क्रीडा नैपुण्य हेरणारे उत्तम प्रशिक्षक देशाला हवे आहेत. देशात अनेक निवृत्त खेळाडू आहेत. त्यांच्या सेवा प्रशिक्षक म्हणून वापरल्या जाव्यात, असेही मत तेंडूलकर यांनी व्यक्त केले.

भारत जगातील सर्वात तरुण देश म्हणून उदयाला येत असून 2020 साली 60 टक्के लोकसंख्या 35 वर्षांच्या आतील असेल. मात्र दुसरीकडे भारत मधुमेहाची राजधानी होत आहे. तसेच लठ्ठपणामध्ये देश जगात तिस-या क्रमांकावर आहे. आपली तरुणाई तंदुरुस्त आणि स्वस्थ रहावी यासाठी क्रीडा हा विषय शिक्षणात समाविष्ट करावा, अशी विनंती तेंडुलकर यांनी राज्यपालांना केली.

यावेळी क्रीडा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्ण, उच्च व तंत्र शिक्षण सचिव सौरभ विजय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर, डॉ. जयश्री तोडकर हे उपस्थित होते.

विद्यापीठांमध्ये क्रीडा संस्कृती रुजावी यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल राज्यपालांनी सचिन तेंडूलकर यांचे अभिनंदन केले तसेच मोहिमेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तरुण आणि स्वस्थ भारत’ अभियानासाठी कॉर्पोरेट जगताचा सामाजिक दायित्व निधी देखील मिळू शकेल असे त्यांनी सांगितले. आदिवासी बहुल क्षेत्रामधील खेळाडूंना मदत करण्याच्या सचिन तेंडूलकर यांच्या भूमिकेचे देखील राज्यपालांनी स्वागत केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button