विजय हजारे क्रिकेट स्पर्धा : मुंबई सलग दुसऱ्यांदा उपांत्यपूर्व फेरीत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/shryas.jpg)
मुंबई : मुश्ताक अली करंडक विजेत्या महाराष्ट्राने गुरुवारी विदर्भाला ३३ धावांनी पराभूत केल्यानंतरही त्यांचे विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे, तर गतविजेत्या मुंबईने सलग दुसऱ्यांदा उपांत्यपूर्व फेरी गाठली.
मुंबईने आठ सामन्यांतील चार विजय आणि प्रत्येकी दोन पराभव आणि रद्द सामन्यांचे २० गुण मिळवून गुणतालिकेत पाचवे स्थान मिळवले, तर महाराष्ट्राला १०व्या स्थानी समाधान मानावे लागले. रविवारपासून उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांना सुरुवात होणार असून सोमवारी मुंबईची गाठ छत्तीसगडशी पडणार आहे. छत्तीसगडने साखळी सामन्यात मुंबईला पराभवाचा धक्का दिला होता. त्याशिवाय उपांत्यपूर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपणही करण्यात येणार आहे.
उपांत्यपूर्व फेरी
रविवार, २० ऑक्टोबर
कर्नाटक वि. पुदुचेरी
दिल्ली वि. गुजरात
सोमवार, २१ ऑक्टोबर
पंजाब वि. तमिळनाडू
मुंबई वि. छत्तीसगड
सर्व सामन्यांची वेळ :
सकाळी ९ वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २