breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी
विंम्बल्डन चॅम्पियन सिमोना हालेपला कोरोनाची लागण
वॉशिंग्टन – विम्बल्डन विजेती सिमोना हालेप हिला कोरोनाची लागण झाली आहे. आपण केलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, असे सिमोनाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
रोमानियाची २९ वर्षाची टेनिसपटू सिमोनाला कोरोनाची लागण झाल्यामुळे ती होम क्वारंटाईन झाली आहे. माझी प्रकृती चांगली आहे. माझ्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. परंतु चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, असे तिने ट्विटमध्ये म्हटले आहे. तुमच्या साथीने मी यावर मात करेन असेही तिने म्हटले आहे. जागतिक मानांकनामध्ये ती दुसऱ्या क्रमांकावर आहे. २०१८ मध्ये ओपन फ्रेंच टेनिस आणि २०१९ मध्ये विम्बल्डनचे विजेतेपद तिने पटकावले आहे. यंदाची विम्बल्डन स्पर्धा कोरोनामुळे झाली नाही.