वर्ल्ड युथ बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या नितूला सुवर्णपदक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/world-youth-champion-ship-.jpg)
बुडापेस्ट (हंगेरी)- बुडापेस्ट येथे सुरु असलेल्या वर्ल्ड युथ बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या नितूने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. या स्पर्धेत नितूने सलग दुसऱ्या वर्षात सुवर्णपदकाची कमाई केली असून 48 किलो वजनी गटात नितूने थायलंडच्या निलादा मेकॉनचा पराभव केला. मागच्या वर्षी गुवाहटीत झालेल्या स्पर्धेतही नितूने सुवर्णपदक पटकावल होते.
सामन्याच्या सुरुवातीला नितू थोडीशी गोंधळलेली पहायला मिळाली होती. मात्र वेळेतच नितूने स्वतःला सावरत सामन्यावर आपली पकड मजबूत बसवली. या आक्रमक खेळामुळे पंचांनी विजेतेपदाचं माप नितूच्या पदरात टाकलं. मागच्या वर्षी गुवाहटीत झालेल्या स्पर्धेत भारतीय महिलांनी 7 पदकं कमावली होती. नितू व्यतिरीक्त भारताच्या मनिषा, अनामिका आणि साक्षी या खेळाडूही पदकांच्या शर्यतीमध्ये आहेत, त्यामुळे या खेळाडूंच्या कामगिरीकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट सुरु केली आहे. दुसरीकडे वर्ल्ड युथ बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत नीतूने (48 किलो) सलग दुसरे सुवर्णपदक जिंकले. गेल्या वर्षीही गुवाहाटी येथे झालेल्या स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावले होते तर यावर्षी पटकावलेले सुवर्णपदक हे नितुचे लागोपाठ दुसरे सुवर्णपदक ठरले आहे. नीतू हरियाणाची असून तिने आशियाई चॅम्पियनशिपही जिंकली आहे. वर्ल्ड युथ बॉक्सिंग चॅम्पियनशिपममध्ये तिचा सामना थायलंडच्या निलाडा मीकून हिच्याशी झाला.
भारताच्या मनीषा (64 किलो), अनामिका (51किलो) आणि साक्षी(57 किलो) यांनी देखील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मनीषाचा सामना इंग्लंडच्या जेम्मा रिचर्डसनशी होणार आहे तर अनामिकाचा डेस्टिनी गार्सियाशी. साशीची लढत क्रोएशियाच्या निकोलिना सासिच हिच्याशी होणार आहे. भारताच्या महिला संघाने गेल्यावेळी सात पदके जिंकली होती. यावेळीही त्यांची कामगिरी चांगली झाली आहे.