Breaking-newsक्रिडा
वन-डे, टी-२०, कसोटी; क्रिकेट कोणतंही असो सत्ता रोहितचीच !
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/Rohit-Sharma-Hitting-sixes.jpg)
लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत भारतीय कसोटी संघात सलामीवीराची भूमिका बजावणाऱ्या मुंबईकर रोहित शर्माने आपलं नाणं खणखणीत वाजून दाखवलं आहे. मयांक अग्रवालच्या साथीने भारतीय डावाची सुरुवात करताना रोहित शर्माने शतकी खेळीची नोंद केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर या नात्याने रोहितचं हे पहिलं तर एकूण कसोटी कारकिर्दीतलं चौथं शतक ठरलं आहे. वन-डे, टी-२० आणि कसोटी या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सलामीवीर या नात्याने शतक झळकावणारा रोहित शर्मा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.
विशाखापट्टणमच्या मैदानात रोहितने आफ्रिकन गोलंदाजांचा समाचार घेतला. रोहितने १५४ चेंडूंचा सामना करत १० चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने आपलं शतक पूर्ण केलं. मयांक अग्रवालनेही त्याला दुसऱ्या बाजूने उत्तम साथ दिली.