Breaking-newsक्रिडा
लक्ष्य सेनला कांस्यपदकावर समाधान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/Lakshay-Sen.jpg)
भारताचा आघाडीची ज्युनिअर बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला कॅनडात सुरु असलेल्या World Junior Badminton Championship स्पर्धेत अखेर कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं आहे. उपांत्य फेरीत लक्ष्यला जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या थायलंडच्या कुनलावत वितीद्सरनकडून पराभव पत्करावा लागला. 1 तास 11 मिनीटं चाललेल्या या सामन्यात कुनलावतने 20-22, 21-16, 21-13 अशा 3 गेममध्ये बाजी मारली.
17 वर्षीय लक्ष्य सेनने याआधी आशियाई ज्युनिअर चॅम्पियनशीप स्पर्धेत कुनलावतचा पराभव केला होता. मात्र त्या कामगिरीची पुनरावृत्ती करणं लक्ष्यला जमलं नाही. 2011 साली भारताच्या समीर वर्माने या स्पर्धेत कांस्यपदक पटकावलं होतं, यानंतर तब्बल 7 वर्षांनी भारतीय खेळाडूला या मानाच्या स्पर्धेत पदक मिळवणं शक्य झालं आहे.