मोहम्मद शामीची पत्नी हसीन जहाँला अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/Hasin-janha.jpg)
पती मोहम्मद शामीवर घरगुती हिंसाचाराचे गंभीर आरोप करत गेल्या वर्षी चर्चेत आलेली हसीन जहाँला वादात आडकली आहे. हसीन जहाँला रविवारी रात्री उशीरा अमरोहा पोलिसांनी मारहाणीच्या प्रकरणात अटक घेतलं आहे.
मोहम्मद शामीची पत्नी हसीन जहाँ मुलीसह रविवारी सायंकाळी सासरी सहसपूर अलीनगरला घरी पोहचली. हसीन घरी पोहचताच सासू आणि दीर यांच्यासोबत तिचे शाब्दिक भांडण झाले. शामीच्या आईनं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. जबरदस्तीने घरात घुसून मला घराबाहेर काढल्याचा आरोप हसीनवर केला. कित्येक तास हा गोंधळ सुरू होता. या गोंधळाची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळावर पोहचले. पोलिसांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. वाद मिटण्याची शक्यता दिसत नसल्यामुळे पोलिसांनी तेथून हसीनला घेऊन गेले. सध्या हसीन जहाँवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
सोमवार सकाळी या प्रकरणाला नवे वळण मिळाले. हसीन जहाँनं माध्यमांशी बोलताना अमरोहा पोलिसांवर गंभीर आरोप लगावले. २०-२५ पोलिसांनी मुलीसह मला गेल्या काही तासांपासून ताब्यात घेतलं आहे. उपाशी ठेवल्याचा आरोपही हसीनने केला आहे. मोहम्मद शामीची असलेली ओळख आणि पैसेमुळे पोलीस त्रास देत असल्याचा आरोप हसीनने केला आहे.
काय आहे वाद – अनेक तरुणींशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप मोहम्मद शमीच्या पत्नीनं फेसबुकवरून केल्यानं गेल्यावर्षी एकच खळबळ उडाली. शमीची पत्नी हसिन जहाँने फेसबुकवर शमीच्या काही अश्लील चॅट्स आणि काही मुलींचे फोटोही अपलोड केलं होते. यामुळे भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. नागपूर, कोलकाता, कराची, काश्मीर आणि बेंगळुरुतील तरुणीचे शामीशी संबंध आहेत, असा आरोप त्याच्या पत्नीनं फेसबुक पोस्टद्वारे केला होता.