भारताची फलंदाजी कमकुवत – पॉन्टिंग
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/ricky-ponting-.jpg)
पर्थ- ऑस्ट्रेलिया मालिकेतील दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा 146 धावांनी पराभव झाल्यावर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉन्टिंगने भारतीय संघाच्या फलंदाजीवर टीका केली. यामध्ये तो म्हणाला, भारतीय संघाच्या फलंदाजीपेक्षा ऑस्ट्रेलियन फलंदाजी बलाढ्य आहे.
पुढे बोलताना पॉन्टिंग म्हणाला, या मालीकेच्या अगोदरही मी बोललो होतो की, ऑस्ट्रेलिया या मालिकेत सरस ठरेल. मला काही निरक्षणांनंतर समजले होते की, भारतीय संघाच्या फलंदाजीमध्ये काही उणिवा आहेत. ज्याचा फायदा ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज घेऊ शकतात. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी त्यांच्या उणीवा नेमकेपणाने हेरल्या आणि त्यामुळे भारतीय फलंदाजी ढेपाळली.
सराव सामन्यात नवोदित सलामीवीर पृथ्वी शॉ ला जायबंदी व्हावे लागले होते. त्यानंतर तो संपूर्ण मालिकेतूनच बाहेर झाला. भारतीय सलामीवीर खराब कामगिरी करत असल्याने मयांक अगरवालला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी बोलावणे पाठवले आहे तर हार्दीक पंड्यालाही पुढील सामन्यासाठी संघात घेण्याची शक्यता आहे. याबाबत बोलताना पॉन्टिंग म्हणाला, फलंदाजी बळकट व्ह्यावी म्हणून भारतीयांनी अन्य सलामीवीराला आणि अष्ठपैलू खेळाडूला बोलावले आहे. त्यांच्या संघ संतुलित नाही. ऑस्ट्रेलियाचा विचार केला तर संघ संतुलित असून भारतीयांना कसे पराभूत करायचे त्यांना समजले आहे.