Breaking-newsक्रिडा
भारताचा चित्रेश नटेशन ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/spt07-2.jpg)
- महाराष्ट्राचा रोहित ‘आशिया-श्री’ किताबाचा मानकरी
- आशिया-श्री शरीरसौष्ठव स्पर्धा
बटामी (इंडोनेशिया) : बटामी, इंडोनेशिया येथे नुकत्याच झालेल्या ‘आशिया-श्री’ अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत भारताच्या चित्रेश नटेशनने ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ किताबावर मोहोर उमटवली. तर महाराष्ट्राच्या रोहित शेट्टीने ‘आशिया-श्री’ हा बहुमान मिळवला.
२७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरदरम्यान रंगलेल्या या स्पर्धेत भारताने आठ सुवर्ण, सहा रौप्य आणि आठ कांस्यपदके मिळवून एकूण २२ पदकांसह पदकतालिकेत दुसरे स्थान मिळवले. केरळच्या चित्रेशने ९० किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकण्याबरोबरच सर्व गटातील सुवर्णपदक विजेत्यांच्या स्पर्धेतही विजेतेपद मिळवले. महाराष्ट्राच्या रोहितने १०० किलो गटात सुवर्णपदकावर नाव कोरले.