breaking-newsक्रिडा

ब्रिटनच्या कॅटरिनाची विश्वविक्रमासह सुवर्णाला गवसणी

दोहा :

ब्रिटनची हेप्टॅथलॉनपटू कॅटरिना जॉन्सन-थॉम्पसनने गुरुवारी मध्यरात्री जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत कारकीर्दीतील पहिल्या सुवर्णपदकावर नाव कोरले. तिने महिलांच्या ८०० मीटर हेप्टॅथलॉन (सात प्रकारांच्या) शर्यतीत बेल्जियमच्या दुसऱ्या क्रमांकावरील नाफित्सो थियामपेक्षा तब्बल ३०४ गुण अधिक मिळवून जागतिक स्पर्धेतील सर्वाधिक गुणांच्या फरकाने सुवर्णपदक जिंकण्याचा विश्वविक्रम रचला.

२६ वर्षीय कॅटरिनाने एकूण ६,९८१ गुण मिळवले, तर थियामला ६,६७७ गुण मिळवता आले. कॅटरिनाला २०१५मध्ये लांब उडीत, तर २०१७मध्ये उंच उडीत अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले होते. त्यामुळे तिला दोन्ही स्पर्धात किमान कांस्यपदकही मिळवता आले नाही. परंतु यंदा तिने २०१६च्या रिओ ऑलिम्पिकविजेत्या थियामवर सरशी साधली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button