breaking-newsक्रिडा

बंदीनंतरही स्टिव्ह स्मिथ अव्वल !!!

एप्रिलमध्ये ऑस्ट्रलिया आणि दक्षिण अफ्रीका कसोटी सामन्यात चेंडू छेडछाड प्रकरणी स्टिव्ह स्मिथ एक वर्ष बंदीची शिक्षा भोगत आहे. तो मागील चार महिन्यांपासून कुठल्याही प्रकारचे क्रिकेट खेळलेला नाही. तरी देखील तो कसोटी क्रमवारीत सध्या पहिल्या क्रमांकावर आहे.
आयसीसीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट दिली तर आपणास कसोटी क्रमवारीतील मानांकन सहज दिसेल. यामध्ये फलंदाजांच्या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ ९२९ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर  विराट कोहली(९०६ गुण), जो रुट (८५५) आणि नंतर केन विलियमसन(८४७) आहेत.
स्टीव्ह स्मिथची कसोटी प्रकारातील मागील काही वर्षातील कामगिरी ही खूप उच्च दर्जाची होती. त्याच कामगिरीच्या जोरावर तो सध्या देखील आपणास अव्वल क्रमांकावर विराजमान दिसतो.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button