breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी
फ्रेंच ओपन २०२० : राफेल नदालची विक्रमी खेळी
यावर्षीच्या फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात राफेल नदालने नोव्हाक जोकोव्हिचला नमवत जेतेपदावर आपले नाव कोरले आहे. या विजयासह राफेल नदालने आपलं क्ले कोर्टवरचं वर्चस्व अबाधित राखलं आहे. ६-०,६-२,७-५ अशा सरळ सेटमध्ये नदालने जोकोव्हिचवर विजय मिळवला आहे. नादालचे फ्रेंच ओपन स्पर्धेतील तेरावं तर एकूण २० वं ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. या जेतेपदासह नदालने रॉजर फेडररच्या २० ग्रँडस्लॅम जेतेपदांच्या विक्रमाचीही बरोबरी केली आहे.