breaking-newsक्रिडा

फिफा विश्‍वचषक : सौदी अरेबियाला नमवून रशियाची विजयी सलामी

फिफा विश्‍वचषक स्पर्धेला शानदार सोहळ्याने प्रारंभ

मॉस्को -उत्कृष्ट सांघिक कामगिरी आणि प्रेक्षकांचा पाठिंबा यामुळे सलामीच्या लढतीत सौदी अरेबियाचे आव्हान मोडून काढताना यजमान रशिया संघाने फिफा विश्‍वचषक स्पर्धेत विजयी सलामी दिली.

मॉस्कोतील लुझनिकी स्टेडियमवर झलेल्या या उद्‌घाटनाच्या सामन्यात रशियाने सौदी अरेबियाचा 5-0 असा पराभव केला. मध्यंतराला रशियाकडे 2-0 अशी आघाडी होती. तत्पूर्वी वेगवान प्रारंभानंतर सामन्यातील 12व्या मिनिटाला रशियाने आघाडी घेतली. या वेळी अलेक्‍झांडर गोलोविनच्या अचूक पासवर युरी गॅझिन्स्कीने चेंडूला गोलची दिशा दाखविली. मध्यंतराला केवळ 2 मिनिटे बाकी असताना रोमन झॉबनिनच्या पासवर डेनिस चेरिशेव्हने रशियाला 2-0 असे आघाडीवर नेले. आर्टेम झियुबीने 71व्या मिनिटाला तिसरा, डेनिस चेरिशेव्हने 91व्या मिनिटाला चौथा व अलेक्‍झांडर गोलोविनने 95व्या मिनिटाला पाचवा गोल करताना रशियाच्या विजयाची निश्‍चिती केली. त्याआधी सामन्यापूर्वी सुमारे अर्धा तास झालेल्या उद्‌घाटन सोहळ्यात नेत्रदीपक प्रात्यक्षिके पार पडली. रशियन क्रीडासंस्कृती आणि फुटबॉल यांचा अनोखा संगम या वेळी पाहावयास मिळाला.

हॅकर्सपासून धोक्‍याचा इशारा

जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रीडाप्रकार असलेल्या फुटबॉलच्या विश्‍वचषक स्पर्धेचा रोमांच अनुभवण्यासाठी जगभरातील हजारो क्रीडाशौकीन रशियात दाखल होत आहेत. परंतु रशियन सायबर स्पाईज किंवा सायबर गुप्तहेरांकडून या पर्यटकांचे लॅपटॉप किंवा मोबाईल फोन हॅक केले जाण्याचा इशारा अमेरिकन हेरखात्याच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिला आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तहेर खात्याचे संचालक विलियम इव्हानिना यांनी सांगितले की, कॉर्पोरेट किंवा शासकीय अधिकारी हे रशियन हेरखात्याचे प्रमुख लक्ष्य राहील. परंतु आपण अत्यंत बिनमहत्त्वाच्या किंवा सामान्य व्यक्‍त आहोत, अशी ज्यांची समजूत आहे, त्याचे लॅपटॉप किंवा मोबाईल फोनही हॅक केले जाण्याची शक्‍यता आहे. यावर उपाय म्हणून रशिया सोडून जाताना पर्यटकांनी जितकी इलेक्‍ट्रॉनिक डिव्हाईस मागे सोडून जाणे शक्‍य आहे, तितकी तेथेच सोडून द्यावीत असा सल्ला त्यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button