Breaking-newsक्रिडा
फिफा विश्वचषक : इजिप्तवर मात करत रशिया दुसऱ्या फेरीत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/russia-1.jpg)
सेंट पीटर्सबर्ग – फुटबॉल वर्ल्डकपमध्ये दुसऱ्या सामन्यात रशियाने इजिप्तचा 3-1 ने पराभव केला. रशियाने सलग दुसरा विजय मिळवून दुसऱ्या फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे.
इजिप्तने मध्यंतरापर्यंत रशियाला गोल करण्यापासून रोखले होते. मात्र, उत्तरार्धातील खेळ सुरू झाल्यावर सामन्याच्या 47 व्या मिनिटाला इजिप्तने आपल्याच गोल पोस्टमध्ये चेंडू टाकत रशियाला आयताच गोल दिला. डेनिस चेरिशेव यांनी 59 व्या मिनिटाला गोल करत रशियाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. नंतर आर्टेम झयूबा याने गोल करत रशियाला 3-0 अशी आघाडी मिळाली. इजिप्तकडून 76 व्या मिनिटाला मोहमंद सलाहने गोल नोंदविला. मात्र , तो संघाला विजयी करू शकला नाही.