Breaking-newsक्रिडा

पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धा : बोपण्णा-शापोलोव्ह उपांत्यपूर्व फेरीत

पॅरिस : भारताचा अव्वल दुहेरी टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याचा कॅनडाचा साथीदार डेनिस शापोलोव्ह यांनी पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे, तर दुसऱ्या फेरीत दिविज शरणचे आव्हान संपुष्टात आले आहे.

बोपण्णा आणि शापोलोव्ह यांनी अमेरिकेच्या मॅन्युएल गोन्झालीज आणि ऑस्टिन क्रॅजिसेकचा ६-१, ६-३ असा ५९ मिनिटांत पराभव केला. फ्रान्सच्या चौथ्या मानांकित फॅब्रिके मार्टिन आणि जेरेमी चार्डी जोडीने शरण आणि आर्टीम सिटाक जोडीला ६-२, ६-३ अशा ५३ मिनिटांत पराभूत केले.

यंदाच्या मोसमात शरणने दोन विजेतेपदांवर नाव कोरले आहे. यापैकी पुण्यात बोपण्णाच्या साथीने आणि सेंट पीटर्सबर्ग येथे इगोर झेलेनेसह मिळवले आहे. बोपण्णाने मात्र यंदाच्या वर्षांत एकमेव जेतेपद मिळवले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button