Breaking-newsक्रिडा

पुजाराची कामगिरी “अस्सल सोने’ – व्हिव्हियन रिचर्ड

जमैका– भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये 71 वर्षांनी कसोटी क्रिकेट मालिका जिंकल्यानंतर सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. यातच वेस्ट इंडिजचा महान खेळाडू व्हिव्हियन रिचर्ड यांनी देखील भारतीय खेळाडूंची पाट थोपटली आहे. एका व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

त्यात ते म्हणाले, भारतीय खेळाडूंनी केलेल्या चांगल्या कामगिरीचे मी कौतुक करतो. विराट आणि त्याच्या संघाने खूप मोठे काम केले आहे. त्यातच विराट आणि पुजाराची फलंदाजीदेखील बघण्यासारखी होती. पुजाराने प्रतिकूल परिस्थितीत केलेला खेळ अस्सल सोन्याच्या बरोबरीचा होता.

पुजारेने चार कसोटींमध्ये सात डावात फलंदाजी करताना 74. 43च्य सरासरीने सर्वाधिक 521 धावा करत तीन शतके ठोकली होती. त्याच्या पाठोपाठ ऋषभ पंतने 58. 33च्या सरासरीने 350 धावा केल्या आहेत. तर कर्णधार विराट कोहलीने 40. 29च्या सरासरीने 282 धावा केल्या होत्या.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button