Breaking-newsक्रिडा
पाक क्रिकेटर मोहम्मद इरफानच्या अपघाती मृत्यूची अफवा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Mohammad-Irfan1.jpg)
इस्लामाबाद : पाकिस्तानी क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानच्या अपघाती मृत्यूची अफवान सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अफवेवर स्वत: मोहम्मद इरफानने ट्विट करुन, आपण सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे.
“मी पूर्णपणे सुरक्षित आहे. माझ्या निधनाचं वृत्त खोटं आणि तथ्यहीन आहे. सोशल मीडियावरील या फेक न्यूजमुळे माझ्या कुटुंबाला त्रास होत आहे” अशा आशयाचं ट्विट मोहम्मद इरफानने केलं आहे.
“कार अपघातात माझा मृत्यू झाल्याची अफवा सोशल मीडियावर पसरवली जात आहे, जी तथ्यहीन आणि फेक आहे. यामुळे माझे कुटुंब आणि चाहत्यांना प्रचंड दु:ख झालं, जे शब्दात सांगू शकत नाही. मला असंख्य फोन कॉल्स आलेत. माझा कोणताही अपघात झाला नाही. आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत”. असं मोहम्मद इरफान म्हणाला.