Breaking-newsक्रिडा
झहीर खान मुंबई इंडियन्सच्या कार्यकारी संचालकपदी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/zahir-khan-.jpg)
जयपूर– भारताचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खान याला मुंबई इंडियन्स संघाच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्त करण्यात आले आहे. मुंबई इंडियन्स संघाने ट्विटरवरून याबाबत च्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
2 कसोटी आणि 200 एकदिवसीय सामान्यांचा दांडगा अनुभव असणाऱ्या जहीर खानने मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. आता या वर्षी मात्र तो सपोर्ट स्टाफच्या भूमिकेत दिसणार आहे. जहीर खान हा दिल्ली डेअरडेव्हिल्स संघात कर्णधार आणि मेंटॉरच्या भूमिकेत होता.
पण 2018 साली त्याने आयपीएल मध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला होता. आता या वर्षी तो पुन्हा एकदा आयपीएलमध्ये दिसणार असून तो सपोर्ट स्टाफच्या भूमिकेत मुंबईच्या संघाला सहकार्य करणार आहे.