breaking-newsक्रिडा

जागतिक बुद्धिबळ स्पर्धा : करुआनाने विजयाची संधी गमावली

जागतिक बुद्धिबळ स्पर्धा

सहावा डाव बरोबरीत राखण्यात कार्लसन यशस्वी

तीन वेळा जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा मध्यावर आली असताना पराभवाचा धक्का बसणार होता. मात्र अखेरच्या क्षणी सावध पवित्रा घेणाऱ्या कार्लसनने अमेरिकेचा आव्हानवीर फॅबियानो करुआनाला सहावा डाव जिंकू दिला नाही. साडेसहा तास ८० चालींपर्यंत रंगलेला हा डाव अखेरीस बरोबरीत सुटला.

सहा डावांनंतर अद्यापही बरोबरीची कोंडी न फुटल्यामुळे दोन्ही खेळाडूंच्या खात्यांवर ३-३ गुण जमा आहेत. स्पर्धा मध्यावर आली असल्यामुळे कार्लसनला पांढऱ्या मोहऱ्यांनिशी रविवारी पुन्हा खेळता येणार आहे.

सहाव्या डावाविषयी २७ वर्षीय कार्लसन म्हणाला, ‘‘माझ्याकडून अनेक चुका झाल्या. त्यातून आता मी सावरलो आहे.’’

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button