Breaking-newsक्रिडा
जम्मू-काश्मीरच्या परवेझ रसुलची धडाकेबाज कामगिरी, स्थानिक क्रिकेटमध्ये ओलांडला २०० बळींचा टप्पा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/Parvej-Rasul.jpg)
जम्मू-काश्मीरचा फिरकीपटू परवेझ रसुलने स्थानिक क्रिकेटमध्ये २०० बळींचा टप्पा ओलांडला आहे. दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात इंडिया ब्ल्यू संघाविरुद्ध खेळत असताना रसुलने ही कामगिरी केली आहे. भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा परवेझ जम्मू-काश्मीरमधला पहिला खेळाडू ठरला आहे. भारतीय संघ आणि आयपीएलमध्ये खेळणारा परवेझ एकमेव काश्मिरी खेळाडू ठरला आहे.
इंडिया रेड संघाकडून खेळत असताना परवेझने ७ बळी घेतले होते. अंतिम सामन्यात परवेझने आश्वासक कामगिरी करत ४ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या परवेझला आतापर्यंत एकमेव टी-२० आणि वन-डे सामन्याचा अपवाद वगळता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळालेली नाहीये. २०० बळींसह परवेझ रसुलच्या खात्यात ३६८० धावाही जमा आहेत.